पुणे: नदीपात्रातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर!

म्हात्रे पूल, राजाराम पुलादरम्यानच्या नदीपात्रातील हरित पट्ट्यात जागामालकांनी बेकायदा बांधकाम केले होते. त्या विरोधात महापालिकेने कारवाई केल्याने जागामालकांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

संग्रहित छायाचित्र

म्हात्रे, राजाराम पूल, कर्वेनगर पात्रातील ९०,००० चौरस फूट क्षेत्र मोकळे, १५ मिळकती जमीनदोस्त

म्हात्रे पूल, राजाराम पुलादरम्यानच्या नदीपात्रातील हरित पट्ट्यात जागामालकांनी बेकायदा बांधकाम केले होते. त्या विरोधात महापालिकेने कारवाई केल्याने जागामालकांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने गुरुवारी सकाळी या जागेवरील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवला. डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषेमध्ये येणारी विनापरवाना बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आली. एकूण १५ मिळकतींवर कारवाई करून सुमारे ९०,००० चौरस फूट क्षेत्र मोकळे केले.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल आणि कर्वेनगरमध्ये नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे केली आहेत. मोठ मोठी हॉटेल, गॅरेज, मंगल कार्यालय उभारले आहेत. मोठे शेड उभारून मंगल कार्यालयाचा धंदा सुरू केला आहे. मात्र हे बांधकाम बेकायदा आहे. त्याला पालिकेची कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे बांधकाम विभागाने सतत नोटिसा दिल्या होत्या. तसेच अनेकदा कारवाईही करण्यात आली होती. ऐन दिवाळीत, लग्नसराईत बांधकाम विभागाने या मंगल कार्यालयांवर कारवाई केली होती. मात्र लग्न समारंभ असल्याने कोणाच्या शुभ कार्यात विघ्न नको म्हणून मंगल कार्यालयांना स्वत:हून अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम काढून घेण्यास सांगितले होते. त्यानंतर पालिकेने कारवाई करू नये यासाठी १३ जागामालकांनी २०२२-२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी सुनावणीमध्ये न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिली. दरम्यान,  ज्या जागामालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली नव्हती, त्यातील काही जणांनी स्वतःहून बांधकाम पाडले, शेड काढून घेतले होते. ज्यांनी स्वतःहून कारवाई केली नाही तेथे महापालिकेने कारवाई केली होती.

नदीपात्रातील ही व्यवसायासाठी वापरता येत नाही, तरीही मोठ्या प्रमाणात बांधकाम करून व्यवसाय सुरू होता. तसेच संबंधित बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्जही केला नव्हता. हा मुद्दा पालिकेच्या न्यायालयात मांडण्यात आला. त्यावर न्यायालयाने बांधकाम नियमित करता येणार नसल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने आज कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. कारवाईदरम्यान स्थानिक, अतिक्रमण विभागाचा पोलीस बंदोबस्त होता.  ५ जेसीबी, दोन गॅस कटर, १० कामगारांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अग्निशमन विभागाची गाडी सज्ज ठेवली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest