पुणे : दत्तवाडी नव्हे तर आता पर्वती पोलीस ठाणे, नामांतराला राज्य सरकारची मंजूरी

पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव आता पर्वती पोलीस ठाणे असे करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 16 Jun 2023
  • 12:39 pm
Pune: दत्तवाडी नव्हे तर आता पर्वती पोलीस ठाणे

दत्तवाडी नव्हे तर आता पर्वती पोलीस ठाणे

दत्तवाडी पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यात होत होता संभ्रम

पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव आता पर्वती पोलीस ठाणे असे करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

पर्वती टेकडी परिसरात पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेले दत्तवाडी पोलीस ठाणे आहे. मात्र, याच परिसरात दत्तवाडी पोलीस चौकी देखील आहे. दत्तवाडी चौकी आणि पोलीस ठाणे यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. याशिवाय, दोन्हीचे नावे सारखीच असल्याने बदनामी देखील होत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली होती.

या परिसरात असलेल्या पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घ्यावे आणि दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव पर्वती पोलीस ठाणे असे करावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर याबाबतच्या प्रस्तावाला १५ जून रोजी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता दत्तवाडी नव्हे तर पर्वती पोलीस ठाणे असे म्हणावे लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest