MNS PUNE : जलतरण तलाव सुरू करा, क्रिकेट खेळून मनसेचे हटके आंदोलन

पुण्यातील औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव आणि आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्विमिंग सूट, गॉगल आणि ट्यूब परिधान करून औंध येथील तलावात क्रिकेट खेळून हटके आंदोलन केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 17 May 2023
  • 04:04 pm
जलतरण तलाव सुरू करा, क्रिकेट खेळून मनसेचे हटके आंदोलन

जलतरण तलाव सुरू करा, क्रिकेट खेळून मनसेचे हटके आंदोलन

१५ दिवसात तलाव सुरू नाही केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ – रणजीत शिरोळे

पुण्यातील औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव आणि आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्विमिंग सूट, गॉगल आणि ट्यूब परिधान करून औंध येथील तलावात क्रिकेट खेळून हटके आंदोलन केले.

पुणे महापालिकेच्या आमदार शिवाजीराव भोसले आणि औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलावाची सध्या दुरावस्था झालेली आहे. हे तलाव २०१७ पासून बंद आहेत. सध्या या तलावात अत्यंत घाण पाणी साचले असून आजबाजूचा परिसरात घाणीचे आणि कचऱ्याचे साम्रज्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना मनसे नेते रणजीत शिरोळे म्हणाले की, वाकडेवाडीतील भोसले तलाव आणि औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. तलावाला गळती लागली असून मेटेनन्सचा त्रास असल्याचे कारणे दिली जातात. पंरतू, त्याच्या मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आणि तुम्ही नागरिकांना खोटे सांगत आहेत. तुम्हाला परवडत नसेल तर नागरिकांच्या करातून हे तलाव बांधले आहे. मग नागरिकांच्या करातूनच या तलावाची दुरुस्ती करा. नागरिकांचा पैसा नागरिकांसाठी वापरला गेला पाहिजे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली असून दारूच्या बाटल्या आहे. त्यामुळे ही अवस्था लक्षात घेता, आता महापालिका प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन येत्या १५ दिवसात जलतरण तलाव नागरिकाच्या सेवेत उपलब्ध करून द्यावा, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असेही शिरोळे यावेळी बोलताना म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest