पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी बजावली कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना नोटीस

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. यासंदर्भात राव यांना सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याविषयी नोटीस बजावत पंधरा दिवसात जाहीर माफी मागावी

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 12:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

माफी मागण्याची केली मागणी

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. यासंदर्भात राव यांना सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याविषयी नोटीस बजावत पंधरा दिवसात जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

राव यांनी कर्नाटकात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सावरकर यांची महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांच्याशी तुलना केली होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. त्यांचे विचार मूलतत्त्ववादी होते,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर सात्यकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी वकील संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत राव यांना नोटीस बजावली आहे.  माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सात्यकी यांनी दिला आहे.

राव यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निराधार आहे. सावरकरांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार आहे. हे विधान त्यांचे व्यक्तिगत आहे का? ही काँग्रेसची भूमिका आहे का? याचाही खुलासा करावा, असे सदर नोटिशीत म्हटले आहे. राव यांनी जाहीर माफी मागावी. तसेच १५ दिवसांच्या आत सार्वजनिक खुलासा करावा, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील अनिवासी भारतीयांच्या कार्यक्रमात सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यांच्यावरदेखील सात्यकी यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात दावा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने राहुल गांधी यांना या विषयी समन्स बजावले आहे. 

राहुल गांधी हे इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना भारतीयांना संबोधित करताना त्यांनी स्वा. सावरकरांचे नाव घेऊन खोटी माहिती दिल्याचा आरोप सात्यकी यांनी केला होता. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest