पुणे : पीएमआरडीए’तील ‘ठाणबंदां’ची अखेर बदली

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील नगररचना विभागात गेल्या आठवड्यामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून थांबलेली अधिकाऱ्यांची पदोन्नती देऊन त्यांना हलवण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sat, 19 Oct 2024
  • 07:38 pm

File Photo

तीन नवीन अधिकारी रुजू, विकास परवानगी विभागात मोठे बदल

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील नगररचना विभागात गेल्या आठवड्यामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून थांबलेली अधिकाऱ्यांची पदोन्नती देऊन त्यांना हलवण्यात आले आहे. तीन नगररचनाकार कामावर रुजू झाले आहेत. एक सहायक संचालक म्‍हणून रुजू झाले आहेत. गेल्‍याच आठवड्यात या सर्वांनी पदभार स्‍वीकारला आहे.

‘सीविक मिरर’ ने अधिकाऱ्यांना पुणे काही सोडवेना या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पाचपेक्षा अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये विविध बदल झाले असून त्यात ‘पीएमआरडीए’  वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले होते. पदोन्‍नतीने बदली होऊनही पुन्‍हा ते याच कार्यालयात नव्‍याने रुजू होत असत. वरिष्ठ पातळीवरील हितसंबंधांमुळे या अधिकाऱ्यांना खुर्ची सोडवत नसल्‍याची स्‍थिती होती.  

नुकतीच नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नगररचनाकार भाग्यश्री ढवळसंग, गणेश चिल्‍लाळ यांची सहायक नगररचनाकार पदी पदोन्‍नती झाली आहे. त्यांची इतर ठिकाणी बदली झाली आहे. या विभागात नव्‍याने तीन नगररचनाकार रुजू झाले आहेत. सहायक संचालक म्‍हणून श्‍वेता पवार या रुजू झाल्‍या आहेत. पुर्वी त्‍या पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात कार्यरत होत्‍या, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.

दरम्यान, विकास परवानगी विभागाबाबत महानगर आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने यापूर्वी शिपाई आणि लिपिकांची विभागामध्ये अदलाबदली करण्यात आली होती. तसेच, विभागप्रमुखांनाही याबाबत देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या विभागातील तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यामुळे प्राधिकरण विभागामध्ये याविषयी चर्चा रंगली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest