Pune Fire News: नवी पेठेतील अभ्यासिका आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी नाही

मागील काही दिवसांत शहरामध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. नवी पेठेमधील गांजवे चौकात असलेल्या ध्रुवतारा अभ्यासिकेमध्ये शनिवारी (दि. १९) सकाळी आग लागली. या आगीत अभ्यासिकेमधील लाकडी साहित्य जळून खाक झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 01:26 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

नवी पेठेतील अभ्यासिका आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी नाही

दोन दिवसात शहरामध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ

मागील काही दिवसांत शहरामध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. नवी पेठेमधील गांजवे चौकात असलेल्या ध्रुवतारा अभ्यासिकेमध्ये शनिवारी (दि. १९) सकाळी आग लागली. या आगीत अभ्यासिकेमधील लाकडी साहित्य जळून खाक झाले.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि अधिकारी घटनास्थळी धावले. त्यांनी पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणली.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील गांजवे चौकात ध्रुवतारा अभ्यासिका आहे. शनिवारी सकाळी अभ्यासिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती कळवली. दलाचे जवान आणि अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागली तेव्हा अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्हते.

दोन दिवसांपूर्वी पहाटे घोरपडे पेठेमधील पंचहौद टॉवरजवळ एका दुमजली घराला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून पाच फायरगाड्या आणि दोन वॉटरटँकर तसेच मुख्यालयातून दोन फायरगाड्या आणि दोन वॉटरटँकर आणि कसबा, एरंडवणा, गंगाधाम अग्निशमन केंद्रामधील प्रत्येकी एक वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जोशी वाडा येथील पाच घरे आणि एक छोटे दुकान जळाले. घरामध्ये वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात साठा असलेला कपड्याचा मालदेखील जळाला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

सुखसागरनगर येथे असलेल्या किसान डेअरीमध्ये शुक्रवारी (दि. १८) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. आग आटोक्यात तर आतमध्ये असलेले मालक रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) आगीत गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. स्थानिकांनी अग्निशामक दलाची मदत पोहोचण्यापूर्वी दरवाजाचे कुलूप तोडून आग शमवली. परंतु, त्याचवेळी डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजले होते. त्यांना स्थानिकांनीच बाहेर काढले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest