Pune: नदीत पडलेल्या तरुणाची सुटका

नदीपात्रामध्ये पडलेल्या तरुणाची जवानांनी दोरी आणि लाईफ जॅकेटचा वापर करून अग्निशामक दलाच्या कसबा अग्निशमन केंद्रातील जवानांनी सुटका केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 20 Oct 2024
  • 01:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

Pune: नदीत पडलेल्या तरुणाची सुटका

नदीपात्रामध्ये पडलेल्या तरुणाची जवानांनी दोरी आणि लाईफ जॅकेटचा वापर करून अग्निशामक दलाच्या कसबा अग्निशमन केंद्रातील जवानांनी सुटका केली. ही घटना महापालिका भवन परिसरातील छत्रपती शिवाजी पुलाजवळ नदीपात्रात घडली.

हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून सोमनाथ निषाद असे त्याचे नाव आहे. तो सुखरूप असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मदतकार्यात जीवरक्षक राजू काची सहभागी झाले. कसबा पेठ अग्निशमन केंद्रातील वाहनचालक संतोष चौरे, जवान हरिश बुंदेले, राजू जगदाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र महाडिक, आतिश नाईकनवरे, सनी लोखंडे यांनी ही कामगिरी केली.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest