पुणे : पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी सचिंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सचिंद्र प्रताप सिंग (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया काम पाहत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 02:56 pm
Pune: पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी सचिंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती

पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी सचिंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती

ओम प्रकाश बकोरिया यांची समाज कल्याणच्या आयुक्तपदी बदली

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सचिंद्र प्रताप सिंग (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया काम पाहत होते. मात्र, आता त्यांची बदली पुणे समाज कल्याणचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी सचिंद्र प्रताप सिंग यांची वर्णी लागली आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोंबर २०२२ मध्ये ओम प्रकाश बकोरिया यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, वर्षभराच्या आतच ओम प्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया यांच्याबरोबरच इतर चार जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

कोणाची बदली कुठे झाली ?

>> सचिंद्र प्रताप सिंग यांची पीएमपीएमएल पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

>> ओम प्रकाश बकोरिया पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावरून पुणे समाज कल्याणचे आयुक्त म्हणून नियुक्ती

>> डॉ. प्रशांत नरनावरे यांची पुणे समाज कल्याणचे आयुक्तपदावरून पुणे महिला व बालकल्याण आयक्त म्हणून नियुक्ती

>> विमला आर. यांची पुणे महिला आणि बालकल्याण आयुक्त पदावरून मुंबईतील एम. एस. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest