Pune RTO : ‘आरटीओ’चे लोका सांगे ब्रह्मज्ञान, विरुद्ध बाजूने दामटविली गाडी (Video)

एकीकडे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आर्थिक स्वरूपात दंड करतात. प्रसंगी वाहने जप्त केली जातात. मात्र,

Pune RTO

Pune RTO : ‘आरटीओ’चे लोका सांगे ब्रह्मज्ञान, विरुद्ध बाजूने दामटविली गाडी

एकीकडे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आर्थिक स्वरूपात दंड करतात. प्रसंगी वाहने जप्त केली जातात. मात्र, दुसरीकडे ‘आरटीओ’ची वाहनेच वाहतुकीचे नियम फाट्यावर मारत असल्याचे दिसत आहे. मंगळवार पेठेतील आरटीओ कार्यालय चौकामध्ये आरटीओची वाहने सर्रास नियमभंग करतात. शासकीय चालक विरुद्ध बाजूने वाहने चालवीत नेतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)



एकीकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विरुद्ध बाजूने वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाची वाहने मात्र बिनदिक्कतपणे नियमभंग करीत आहेत. या वाहनांवर कारवाई होणार का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest