नववर्षाची सुरुवात स्वच्छतेच्या संकल्पापासून

प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या वतीने नव्या वर्षाचा पहिला दिवस स्वच्छतेचा संकल्प करून साजरा करण्यात आला. 'स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२५' व सफाई सैनिकांसोबतच सर्व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी यावेळी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 11:46 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

१ जानेवारी २०२५' स्वच्छतेचा संकल्पदिन' म्हणून झाला साजरा, महापालिकेचे कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पुढाकार

प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या वतीने नव्या वर्षाचा पहिला दिवस स्वच्छतेचा संकल्प करून साजरा करण्यात आला.  'स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२५' व सफाई सैनिकांसोबतच सर्व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी यावेळी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.

हा कार्यक्रम डहाणूकर कॉलनीतील गोल सर्कल, स्व. वामनराव डहाणूकर उद्यान येथे पार पडला. अनेक व्यक्ती नव्या वर्षात काही संकल्प करत असतात. दारू सोडणार, तंबाखू , गुटखा व पान खाणार नाही, विडी-सिगारेट पिणार नाही, रोज अभ्यास करणार असे अनेक संकल्प केले जातात. कोथरूडमधील स्वच्छताप्रेमी, व्यवसायिक, पथारीवाले, हातगाडीवाले, भाजी व फळविक्रेते यांनी एकत्र येत ओला व सुका कचरा वेगळा करणे, उघडयावर व नदी-नाल्यात, रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकणार नाही, उघड्यावर लघूशंका करणार नाही तसेच सार्वजनिक रस्त्यावर थुंकणार नाही, स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास देणार असे संकल्प सोडले.  १ जानेवारी २०२५  हा दिवस 'स्वच्छता संकल्प दिन' म्हणून म्हणून साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रमांक दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तसेच आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, हनुमंत चाकणकर, मुकादम वैजीनाथ गायकवाड, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, गणेश चव्हाण, आण्णा ढावरे, प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक, साईराज दुबळे, रोहन जाधव, सलीम पठाण, ऋषीकेश भालशंकर तसेच सेवक परेश कुचेकर, कुणाल जाधव, प्रविण कांबळे, सुरेश कंधारे, चंद्रकांत धोत्रे, शरद वावळकर,अभिषेक गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.  तसेच या संकल्प दिनाच्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे उपप्रांतपाल किरण इंगळे, सामाजिक कार्यकर्ते बाळू दांडेकर, सौदागर शिंदे, व्यावसायिक रवि पाटील, तसेच तेथील व्यापारी संघटनेचे शशिकांत उभे, स्वच्छ संस्थेचे रोहन खिलारे, सेवासहयोगचे युवराज चाबुकस्वार, मंदार जाधव व इतर नागरिकांनी सहभाग नोंदवला.

Share this story

Latest