Pune Accident : रुग्णलायतून उपचार घेऊन घरी जाताना अपघातामध्ये दीर-भावजयचा मृत्यू; भरधाव कारने...

पुणे विमानतळानजीक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दीर- भावजयाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे रुग्णलायतून उपचार घेऊन घरी जात असताना हा अपघात घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 10:29 am
accident news, PUNE NEWS, Pune Accident, hospital, पुणे अपघात, अपघात

संग्रहित छायाचित्र

पुणे विमानतळानजीक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दीर- भावजयाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे रुग्णलायतून उपचार घेऊन घरी जात असताना हा अपघात घडला. 

 

आशीर्वाद गोवेकर(52) व रेश्मा गोवेकर (66) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी  गाडीची समोरासमोर धडक झाली. 

 

नेमका अपघात घडला कसा? 

रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने एअर फोर्सच्या ईसीएच रुग्णालयात आशीर्वाद गोवेकर सकाळी दुचाकी वरुन घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन घरी निघाले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे चौकाकडे वळत होते. दुचाकी वळण घेतं असताना येरवड्याच्या दिशेने जाणारी बस व इतर वाहने थांबली होती. 

याच दरम्यान फाईव्ह नाइनच्या दिशेने भरधाव वेगात महिंद्रा एसयूव्ही कार थांबलेल्या बस व इतर वाहनांना भरधाव वेगात ओव्हर टेक करत असताना दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेश्मा गोवेकर यांचा उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

Share this story

Latest