संग्रहित छायाचित्र
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे नवे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्याने ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे. जितेंद्र डूडी यांच्या जागी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी येणार आहेत.
डॉ. सुहास दिवसे यांची पदोन्नती होवून त्यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख पुणे रिक्त पदावर करण्यात आली आहे.