पुरातत्त्व खात्यामार्फत बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात आंदोलन

पुरातत्व खात्यामार्फत विविध बौद्ध लेण्यांचे तत्काळ संवर्धन व्हावे, यासह अनेक मागण्यांकरीता मंगळवारी (दि. १५) पुण्यात पाताळेश्वर येथील पुरातत्व विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Oct 2024
  • 02:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुरातत्व खात्यामार्फत विविध बौद्ध लेण्यांचे तत्काळ संवर्धन व्हावे, यासह अनेक मागण्यांकरीता मंगळवारी (दि. १५) पुण्यात पाताळेश्वर येथील पुरातत्व विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

घोरावाडी (शेलारवाडी), बेडसे, कार्ला, भाजे, पाटण, बौद्ध लेणी पुणे-मुंबई महामार्गांवर त्वरित दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. येळघोल, शिरवळ, तसेच कराड तालुक्यातील दुर्लक्षित बौद्ध लेणी संरक्षित तथा संवर्धीत कराव्यात. जुन्नर तालुक्यातील अंबा अंबिका भीमाशंकर भूत लेणी यांना जोडणारा चांगल्या दर्जाचा रस्ता बनविण्यात यावा तसेच विजेची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवावी. भंडारा डोंगर (सुदुंबरे गांव) देहूरोड बौद्ध लेणी अतिक्रमण काढून तेथील प्राचीन बौद्ध स्तुपाचे संवर्धन, तथा येण्याजाण्यासाठी रस्ता तसेच विजेचे पथदिवे उभारण्यात यावे. कोंडाणे लेणी कर्जत येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे लेणींची मोठया प्रमाणात पडझड होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी. जुन्नर तालुक्यातील सुलेमान टेकडीवर असणाऱ्या बौद्ध लेणीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने, अभ्यासक पर्यटक यांची गैरसोय होत आहे आणि सद्यस्थितीत लेणीवर जाणे जीवावर बेतू शकते, यासाठी तेथे स्वतंत्र्य रस्ता आणि संरक्षण कठडे उभारण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

प्राचीन बौद्ध वारसा आणि त्याचा अभ्यास जनसामान्यास कळण्यासाठी संरक्षित लेणीवर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड (अभ्यासक) नेमण्यात यावे. प्रत्येक लेणीवर पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. विविध लेणींवर असणारे शिलालेख तसेच प्राचीन शिल्प जतन करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. कार्ला, भाजे, बडसे या बौद्ध लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करणे, सदर मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास लोकशाहीने मार्गाने राज्यभरात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते व आयोजक मिलिंद अहिरे, दीपक गायकवाड, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे, सचिन साठे, श्रीनाथ कांबळे व महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक समूह उपस्थित होते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest