पुणे : चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर झाला पलटी, चार जण जखमी

पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्गावरील चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पटली झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार प्रवासी होते. अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 30 Jun 2023
  • 10:59 am
Accident : खासगी टेम्पो ट्रॅव्हलर झाला पलटी, चार जण जखमी

खासगी टेम्पो ट्रॅव्हलर झाला पलटी, चार जण जखमी

अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने झाला पलटी

पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्गावरील चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पटली झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार प्रवासी होते. अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी (शुक्रवारी) ७ वाजून ३५ मिनिटांनी झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे–बंगळुरू द्रुतगती मार्गावरून एक खासगी टेम्पो ट्रॅव्हलर कर्वेनगरकडून हिंजवडीच्या दिशेने जात होता. पुण्यातील चांदणी चौकात येताच टेम्पो ट्रॅव्हलरचा अचानक स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चांदणी चौकात टेम्पो ट्रॅव्हलर पलटी. यावेळी वाहनात चार प्रवासी होते. प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, सध्या राज्यभरासह पुण्यात पाऊस सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच द्रुतगती मार्गावर टेम्पो ट्रॅव्हरल पटली झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी भर पडली होती. सध्या टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पो ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest