पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची काढली धिंड

मोडीत काढण्यासाठी पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सहकारनगरमध्ये ज्या ठिकाणी टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणी पोलीसांनी टोळक्यांची धिंड काढली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 30 Jun 2023
  • 10:34 am
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची काढली धिंड

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची काढली धिंड

वाहनांची तोडफोड करणाऱ्या ३१ जणांना पोलीसांनी केली अटक

गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांचा हौदोस सुरू आहे. सातत्याने वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. याचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. असेच प्रकार मोडीत काढण्यासाठी पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सहकारनगरमध्ये ज्या ठिकाणी टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणी पोलीसांनी टोळक्यांची धिंड काढली आहे.

पुण्यात सहकारनगर परिसरात अरणेश्वर येथे सोमवारी टोळक्यांनी मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली होती. दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यातून गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. परिसरात गाड्यांची तोडफोड केल्यामुळे सामान्य नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. यातच पोलिसांनी या प्रकरणी ३१ लोकांना अटक केली आहे. यानंतर गुरूवारी यातील प्रमुख आरोपींची पोलिसांनी धिंड काढली.

दरम्यान, यापुर्वी वारजे आणि सहकारनगरमध्ये टोळक्यांनी उच्छात मांडला होता. टोळक्यांच्या तोडफोडीमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसार झाले होते. या प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले होते. मात्र तरीदेखील टोळक्यांचा धुडगुस सुरूच होता. सोमवारी अरणेश्वर परिसरातील वाहनांची टोळक्यांनी तोडफोड केली. त्यामुळे अखेर पोलीसांनी टोळक्यांचे प्रकार मोडीत काढण्यासाठी अरणेश्वर परिसरात धिंड काढली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest