पुणे: वैद्यकीय मदतीसाठी पालिकेत गोंधळ!

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एका नागरिकाने आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचा प्रकार बुधवारी महापालिकेत घडला. संबंधित व्यक्तीच्या नावावर दोन मिळकती असून ते योजनेच्या अटीमध्ये बसत नाहीत. त्यामुळे लाभ देता येणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगताच त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच सोबतीला आलेल्या एका माजी नगसेवकानेअधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Edited By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 02:50 pm
Pune news, pmc,  Health Department, Urban Poor Medical Assistance Scheme,

संग्रहित छायाचित्र

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेस अपात्र असतानाही घातला गोंधळ, माजी नगरसेवकाचा दबावाचा प्रयत्न

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एका नागरिकाने आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचा प्रकार बुधवारी महापालिकेत घडला. संबंधित व्यक्तीच्या नावावर दोन मिळकती असून ते योजनेच्या अटीमध्ये बसत नाहीत. त्यामुळे लाभ देता येणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगताच त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच सोबतीला आलेल्या एका माजी नगसेवकानेअधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी महापालिकेकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक उपचाराच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे लागते. योजनेचे सभासद झाल्यावर महानगरपालिकेद्वारे एक कार्ड दिले दिले जाते. या कार्डावर लाभार्थ्याला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात. महापालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधेही मोफत दिली जातात. मात्र, खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी झालेला एकूण खर्च जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर लाखाच्या पुढील रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.

योजनेचे कार्ड काढण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार इतके असेल तर त्याला योजनेचा लाभ दिला जातो. कार्ड काढणाऱ्या व्यक्तीची माहिती आरोग्य विभागाच्या संबंधित सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात आल्यानंतर तो किती कर भरतो, याची माहिती लगेच समजते. त्यानुसार गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीच्या नावावर दोन मिळकत आहेत. तो भरत असलेल्या कराचा विचार केला असता, संबंधित व्यक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अपात्र ठरला होता. हीच गोष्ट महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याला समजावून सांगण्यात येत होती. मात्र तो ही बाब ऐकण्याची परिस्थितीमध्ये नव्हता. काही करुन योजनेचा लाभ द्या, अशी मागणी त्याच्याकडून केली जात होती. त्यावेळी एका माजी नगरसेवकाची त्याला साथ मिळत होती. त्यामुळे अपात्र व्यक्तींना लाभ देण्यासाठी माजी नगरसेवकांकडूनच दबावतंत्र वापले जात असल्याचे दिसून आले.

शहरातील १४ ते १५ हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. अनेक नागरिकांना या योजनेचा फायदा होत आहे. मात्र काहीजणांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित प्रकरणाबाबत आरोग्य प्रमुखांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

अधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप

 योजनेचा लाभ देण्याची मागणी करून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला नियमावली सांगण्यात आली. तसेच ही योजना गोरगरीबांसाठी आहे. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांसाठी असल्याचे सांगण्यात आल्याने वाद घालणाऱ्याने थेट अधिकाऱ्यांवरच पैसे दिलेच तरच कार्ड देणार असा गंभीर आरोप केला. त्यामुळे अधिकारी अस्वस्थ झाले. कशीबशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र काही केल्या तो व्यक्ती शांत होत नव्हता. मात्र काही वेळाने प्रकरण शांत झाल्यानंतर ती व्यक्ती आणि माजी नगरसेवक निघून गेले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest