पुणे : आरटीओकडून पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वेल्हा, उरळी कांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट, शिरूर, जेजुरी, सासवड व भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 23 Jun 2023
  • 11:33 am
आरटीओकडून पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

आरटीओकडून पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती

जुलै २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वेल्हा, उरळी कांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट, शिरूर, जेजुरी, सासवड व भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ७ जुलै रोजी वेल्हा, , १८ आणि २४ जुलै रोजी उरळी कांचन, ११ जुलै रोजी हडपसर, १० व २५ जुलै रोजी शिक्रापूर, १३ जुलै रोजी पिरंगुट, , १२ आणि १९ जुलै रोजी शिरूर, २१ जुलै रोजी जेजुरी, ३ आणि १४ जुलै रोजी सासवड आणि ६ व १७ जुलै रोजी भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्याच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास त्या दिवसाचा दौरा आधीचा दिवस किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest