पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शाहू पुण्यतिथीचा विसर !

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख निर्माण होईल, असे भाकित भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवहारलाल नेहरू यांनी व्यक्त केले होते. परंतु पुणे विद्यापीठ प्रशासनाला आज (सोमवार ६ मे) आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा विसर पडल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.

Savitribai Phule Pune University

संग्रहित छायाचित्र

पुणे : 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख निर्माण होईल, असे भाकित भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवहारलाल नेहरू यांनी व्यक्त केले होते. परंतु पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) प्रशासनाला आज (सोमवार ६ मे) आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा विसर पडल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. सायंकाळी ४ वाजल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली.

राहूल ससाणे, पीएचडी संशोधक आणि समन्वयक, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती म्हणाले, "अत्यंत संतापजनक प्रकार आहे. एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे जाणीवपूर्वक छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचे विस्मरण करायचे. आम्ही समितीच्या वतीने पुण्यतिथीची आठवण करून देत या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.  अखेर सायंकाळी ४ नंतर कुलगुरू सुरेश गोसावी, प्र कुलगुरू पराग काळकर आणि कुलसचिव विजय खरे यांनी पुष्पहार अर्पण केला."

या संदर्भात कुलगुरू, प्र कुलगुरू आणि कुलसचिवांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest