संग्रहित छायाचित्र
तीन वर्षांपूर्वी दोघांचे लग्न वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. त्यानंतर वाद होऊ लागले. लग्नानंतर दीड वर्षांनी बाळंतपणासाठी गेलेली ती कायमचीच माहेरी गेली. दीड वर्षापासून दोघेही विभक्त राहात आहेत. सामोपचाराचे कोणत्याही प्रयत्नांना दोघांनीही फारसा प्रतिसाद दिला नसल्याने लग्नानंतर अवघ्या काही वर्षात दोघांनीही घटस्फोटाचा मार्ग पत्करला. 'चट मंगनी पट शादी' च्या धर्तीवर 'चट झगडा पट तलाक' अशी स्थिती याप्रकरणाव निर्माण झाली. (Divorce)
त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीला नोकरीनिमित परदेशी जायचे असल्याने घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून वहमाव मावळ येथील दिवाणी न्यायधीश (वरिष्ठत्तर) आर. ए. शिंदे यांनी एका दिवसात दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केला.
रोहित आणि प्रज्ञा (नावे बदलली आहेव) यांचे ३० नार्च २०२१ रोजी लग्न झाले. लग्नानंतर रोहित आगि ऋज्ञा ह्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. हळूहळू वाद विकोपाला जाऊ लागले. दरम्यान, प्रज्ञा गरोदर राहिली, बाळंतपणासाठी ती नोव्हेंबर २०२२ ला नाहेरी गेली, ती कायमचीच.
दोघांनी व नातेवाईकांनी त्यांनी एकत्र देण्यावायत प्रयत्न केले परंतु ते निष्कळ ठरले. त्यानंतर प्रक्षा हिने वकिलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठविली. रोहितला नोटीस मिळाल्यानंतर त्याने वकिलांमार्फत प्रज्ञाच्या वकिलांशी संपर्क साधला आणि संनतीने घटस्फोट घेण्यास तयारी दर्शविली. रोहित आणि प्रज्ञा यांनी अॅड. अमित राठी व अॅड. दाभाडे यांच्यामार्फत वडगाव मावळ पुणे येथील दिवाणी न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता २ मे रोजी अर्ज दाखल केला. दोघे अर्जदार हे नोव्हेंबर २०२२ पासून एकमेकापासून विभक्त राहात असून, १८ महिन्यांचा विभक्त कालावधी (संमतीने घटस्फोट दाखलपूर्वी बारा नहिने विभक्त आणि दाखल केल्यानंतर सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी) पूर्ण झाला आहे. तसेच रोहित यास नोकरी निमित्त परदेशी जायचे आहे. दोघांची वये पाहता सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून घटस्फोट मंजूर करण्याबाबत अॅड. राठी यांनी न्यायालयाला विनंती केली. अॅड. राठी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत रोहित आणि प्रज्ञा यांना एका दिवसात घटस्फोट मंजूर केला. अर्जदार पतीतर्फे अड. अमित राठी यांनी काम पहिले व अड. आदित्य जाधव यांनी सहकार्य केले.