श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) सारसबाग पुणे येथील भगवान श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह संपन्न झाला.

ShriSwamiSamarthdeathanniversaryceremony

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा

llश्री स्वामी समर्थll

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) सारसबाग पुणे येथील भगवान श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने  अखंड नाम जप यज्ञ सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहामध्ये प्रहर सेवा, गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती या ग्रंथांचे शेकडो भाविकांनी पारायण केले. श्री स्वामी समर्थ, महामृत्युंजय, नवार्ण व इतर मंत्रांची लाखोंच्या संख्येत जप केला. त्याचप्रमाणे यज्ञ विभागात गणेश याग, श्री स्वामी याग, चंडी याग, गीताई याग, रुद्र याग, मल्हारी याग  असे याग करण्यात आले. प्रत्येक कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष उपस्थित  असून त्यांच्या हस्ते हे यज्ञ करण्यात आले.  सोमवार दिनांक 6.5.2024 रोजी महाआरतीने  सप्ताहाची सांगता झाली. यावेळी आरतीला हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांना तीर्थ व प्रसाद देण्यात आला. या सेवा केंद्रामध्ये नेहमीच भाविकांची प्रचंड गर्दी असते व सेवा ही मनोभावे केली जाते. येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest