Pune News: लष्कर घेणार न्यू क्लबचा (पूना) ताबा

पुणे: जमिनीचा भाडेपट्टा संपल्याने तसचे १७ कोटी रुपयांच्या कराची थकबाकी असल्याने लष्कर न्यू क्लबचा (पूना) चा ताबा घेणार आहे. (Latest News Pune)

The New Club Poona

लष्कर घेणार न्यू क्लबचा (पूना) ताबा

जमिनीचा भाडेपट्टा संपल्याने तसचे १७ कोटी रुपयांच्या कराची थकबाकी असल्याने कारवाई

पुणे: जमिनीचा भाडेपट्टा संपल्याने तसचे  १७ कोटी रुपयांच्या कराची थकबाकी असल्याने लष्कर न्यू क्लबचा (पूना) चा ताबा घेणार आहे. (Latest News Pune)

डिफेन्स इस्टेट ऑफिस (डीईओ) पुणे (DEO Pune) यांनी दक्षिण कमांडच्या संरक्षण मालमत्ता विभागाला क्लबचा ताबा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या क्लबची थकबाकी असल्याने तसेच भाडेपट्टा संपल्याने डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण कमांड डिफेन्स इस्टेट्सचे संचालक सौरव रे यांनी त्याचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक परिसर निष्कासन कायदा १९७१ मधील संबंधित तरतुदीनुसार तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.

द न्यू क्लब (पूना) लिमिटेड  (The News Club Poona) राजेंद्रसिंहजी रोडवरील सदर्न कमांड कँटिनजवळ बंगला क्रमांक २ येथे आहे. हा क्लब सुमारे एक लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. १० हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे.  न्यू क्लबची (पूना) सुरुवात १९१८ मध्ये झाली. ४ सप्टेंबर १९४८ रोजी त्याचे क्लबमध्ये रूपांतर झाले. या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट, क्लब शॉप, परमिट रूम आदी सुविधा आहेत. विवाहसोहळे, वाढदिवसाचे कार्यक्रमही येथे साजरे होतात.

नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सीविक मिरर’शी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, भाडेपट्ट्याची पाच वर्षांची मुदत संपली असूनही क्लब कार्यरत आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच सदस्यत्व शुल्क मिळत असूनही क्लबच्या व्यवस्थापनाने  १७ कोटी रुपयांची थकबाकी भरलेली नाही.

द न्यू क्लब (पूना) लिमिटेडचे सचिव सुनील भोसले यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना नोटीस आली असल्याची  कबुली दिली आहे. मात्र, थकबाकी प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी नाकारला आहे. या नोटिशीविरोधात आम्ही न्यायालयातही गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest