संग्रहित छायाचित्र
पुणे: येत्या २२ जानेवारी ला आयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर अयोध्येला (Ayodhya) जाणाऱ्या श्रीराम भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे ते अयोध्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. श्रीराम भक्तांसाठी पुण्यातून १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी १५ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघेल. (Latest Pune News)
एका गाडीतून सुमारे दीड हजार लोक प्रवास करू शकतील. प्रवाशांचा प्रतिसाद बघता पुढील काळात विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यातून नेमक्या कोणत्या गाड्या धावणार याची माहिती येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. तसेच या सर्व गाड्या स्लिपर कोच असतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.