कोरेगाव पार्कमधील वेस्ट इन हॉटेलसमोर चारचाकी वाहनांना अपघात
कोरेगाव पार्क येथील वेस्ट इन हॉटेलसमोर शनिवारी पहाटे अंदाजे २:३० वाजता चारचाकी वाहनांना अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एक खाजगी कॅब वाहन आणि आलिशान कार डिव्हायडरवर जाऊन एकमेकांना धडकल्या.
आलिशान कारचे या अपघातात मोठे नुकसान झाल्याची माहिती असून चालक कारमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चालकाला अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. घटनास्थळावर काही तरुण देखील उपस्थित होते.
मुंढवा पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.