PUNE: चाकण, आळंदी, राजगुरुनगरसह लगतच्या गावांना नवीन महानगरपालिका

पिंपरी चिंचवड: पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होवून महानगरपालिकांची हद्द वाढ झालेली आहे. त्यामुळे दोन्ही महानगरपालिकेवर पायाभूत सोयी-सुविधांचा नागरिकांना

Chakan

संग्रहित छायाचित्र

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास अनेक गावांचा विरोध

विकास शिंदे
पिंपरी चिंचवड: पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होवून महानगरपालिकांची हद्द वाढ झालेली आहे. त्यामुळे दोन्ही महानगरपालिकेवर पायाभूत सोयी-सुविधांचा नागरिकांना लाभ देण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये नवीन गावांना समावेश करुन घेण्यास विरोध आहे. यामुळेच चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, राजगुरु नगरपरिषद यासह त्यांच्या लगतची आणि परिसरातील गांवाची नवीन स्वतंत्र महानगरपालिका निर्माण करणे शासनाचा विचाराधीन आहे.  (Pune News)

याबाबत जिल्हाधिका-यासह विविध आयुक्तांनी सविस्तर अहवाल मागवून आपल्या अभिप्रायासह शासनास पाठवावे, असे आदेश नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महानगरपालिकांची हद्द वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. त्यामुळे चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, राजगुरुनगर परिषद, त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .

शासनाच्या नगर विकास विभागाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ आणि चाकण, आळंदी, राजगूरु नगर परिषदांच्या मुख्याधिका-यांना नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत २४ जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठविण्यात आले आहे.  

या पत्रात चाकण नगरपरिषद आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर परिषद तसेच त्यांच्या परिसर लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महानगरपालिका करण्यास शासनाच्या विचाराधीन असल्याचे कळविले आहे.

तसेच त्या प्रस्तावास अनुसरून चाकण नगरपरिषद आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरात आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ लोकसंख्या हद्द आदी तपशील घेण्यात येणार आहे. त्या तीन्ही नगरपरिषदांसह लगतच्या गावांची एक स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्यास अभिप्राय मागविण्यात आले आहेत.  

यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी चाकण आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषद यांचा अहवाल तेथील स्तरावरून मागून ते त्यांच्या अभिप्रायासह शासनास पाठवण्याचा आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन प्रियंका कुलकर्णी -छापवाले यांनी दिला आहे.

यापुर्वीच देहू-आळंदी, चाकणचा समावेश वगळला

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत देहू व आळंदी हे तीर्थक्षेत्र तसेच, चाकण एमआयडीसीचा भाग समाविष्ट करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र, आळंदी व चाकण नगरपालिका असल्याने समावेश झाला नाही. त्यानंतर देहू ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली. त्यामुळे देहू गाव ही वगळण्यात आले. तसा, सुधारित प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. तसेच, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे ही गावेही वगळण्यात आली आहेत, अशी माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest