Accident : महापालिकेच्या कचरा डंपरची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या कचरा डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डंपर चालक घटनास्थाळावरून पळून गेला आहे. हा अपघात खराडी येथील भुलाजी पठारेनगर परिसरातील युवॉन फ्रंट रोडवरील बालाजी स्वीट दुकाना समोर १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 22 May 2023
  • 11:00 am
महापालिकेच्या कचरा डंपरची दुचाकीला धडक

महापालिकेच्या कचरा डंपरची दुचाकीला धडक

अपघातानंतर डंपर चालकाचा घटनास्थळावरून पोबारा

पुणे महापालिकेच्या कचरा डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डंपर चालक घटनास्थाळावरून पळून गेला आहे. हा अपघात खराडी येथील भुलाजी पठारेनगर परिसरातील युवॉन फ्रंट रोडवरील बालाजी स्वीट दुकाना समोर १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

अशोक नवनाथ दराडे (वय २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अशोकचा आतेभाऊ प्रदिप घुगे (वय १९, रा. वाघोली, पुणे) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपर चालकाच्या विरोधात चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास युवॉन फ्रंट रोडने वाघोलीतून पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी महापालिका कचरा उचलण्याच्या डंपरने अशोकच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोकचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अशोकच्या मृत्यूनंतर आतोभाऊ प्रदिपने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात डंपर चालकाविरोधात कलम २७९, ३०४ (अ), ३३८, ४२७, मोव्हेॲक्ट १३२ (१) (क), ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest