पुणे: पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण केल्याचा महापालिका आयुक्तांचा दावा, तरीही शहर पाण्यात

पुणे: शहरात गेल्या आठ ते दहा दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागात पाण्याची तळी साचत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी शहराच्या जुन्या हद्दीतील पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.

PMC News

पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण केल्याचा महापालिका आयुक्तांचा दावा, तरीही शहर पाण्यात

पुणे: शहरात गेल्या आठ ते दहा दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागात पाण्याची तळी साचत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी शहराच्या जुन्या हद्दीतील पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कामे झाली असली तरी पाणी कसे काय साचते असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. 

पुण्यात पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप येत असल्याने वाहन चालक त्रासले आहेत. तसेच अनेक भागात पाण्याची तळी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या वळवाच्या पावसाने शहराची दैना उडत आहे. अद्याप मॉन्सुनला सुरवात झालेली नाही. यंदा पाऊस अधिक असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करुन पावसाळी लाईन योग्य प्रकारे साफ करण्याची गरज असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, शहराच्या अनेक भागात साचत असलेले पाणी पावसाळी वाहिन्यांच्या झाकणावर कचरा साठत असल्याने ही सिमेंटची झाकणे बदलून जास्तीत जास्त लोखंडी जाळ्या लावण्यात येणार असून उर्वरीत काम पावसाळ्यात पूर्ण केली जाणार आहे. नाले सफाई करण्यासाठी पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणी आधी काम केले असल्याचा दावाही आयुक्तांनी केला. शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट आहेत. तर नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर आहे. त्यातील ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे १५ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. हे काम जवळपास ९८ टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.  तर उर्वरीत काम पावसाळ्यापूर्वी केले जाईल. या शिवाय शहरात असलेल्या ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक असून या सर्व ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असेही आयुक्त भोसले यांनी सांगितले. 

महापालिका पुन्हा लोखंडी जाळ्या बसविणार 

शहरात ज्या भागात अवकाळी पावसाने पाणी साचले होते. त्या भागात साचलेले पाणी कचरा व मातीमुळे साचले असून पावसाळी चेंबरची झाकणे सिमेंटची असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंटची झाकणे बदलून त्या जागी लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहेत. महापालिकेकडून या पूर्वी बसविण्यात आलेल्या जाळ्या चोरी होत असल्याने महापालिकेने सिमेंटच्या जाळ्या बसविण्यात येत होत्या. मात्र, शहरातील उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेता महापालिका पुन्हा लोखंडी जाळ्या बसविणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest