पुण्यातील मेट्रो स्थानकात टाईमपास नकोच, ९० मिनिटांमध्ये नागरिकांना करावा लागणार प्रवास
पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर केवळ २० मिनिटे थांबता येणार आहे. तसेच पुढील प्रवाश ९० मिनिटांच्या आत करावा लागणार आहे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेश पुणे मेट्रो प्रशासनाने काढले आहेत.
पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. मात्र, काही हौसी प्रवासी तासनतास मेट्रो स्थानकावर थांबून राहताना दिसून येत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना प्रवास करणे अडचणीचे ठरत आहेत. अशातच प्रवाशांसाठी मेट्रो प्रशासनाने नवे आदेश जारी केले आहेत.
मेट्रो प्रशासनाच्या आदेशानुसार, १ ऑक्टोबर २०२३ पासून सशुल्क क्षेत्रात प्रवेश / बाहेर जाण्यासाठी वेळेची मर्यादा लागू करण्यात आली आहे. प्रवासी तिकीट काढल्यावर त्याच स्थानकावर प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी सशुल्क क्षेत्रात केवळ २० मिनिटे थांबू शकतो. तिकीट काढल्यानंतर पोहचण्याच्या स्थानकावर बाहेर जाण्यासाठी सशुल्क क्षेत्रात केवळ ९० मिनिटे थांबू शकतो.
म्हणजेच, प्रवाशांनी एखाद्या मेट्रो स्थानकावरून तिकीट काढल्यानंतर त्याला ९० मिनिटात पुढील प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा, संबंधित तिकीट अवैध ठरणार आहे. तशा पद्धतीची ऑनलाईन यंत्रणा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. तिकीटी अवैध ठरल्यानंतर प्रवाशांना स्थानकाबाहेर पडणे शक्य होणार आहे. मेट्रो स्थानकामध्ये ९० मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, सुरळीत प्रवास अनुभवासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आम्हाला प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.