तापमान
पुण्यासह महाराष्ट्राचा पारा पुन्हा एकदा तापणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात गुरूवारी सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जळगावमध्ये ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
असे होते गुरूवारी पुण्यातील तापमान :
कोरेगाव पार्क ४४.४, पुरंदर ४१.२, धामधेरे ४३.८, आंबेगाव, ४१,१, वडगावशेरी ४३.३, पाषाण ४१.१, शिरूर ४२.९, शिवाजीनगर ४१.०, राजगुरूनगर ४२.९ गिरिवन ४०.७, खेड ४२.७, एनडीए ४१.०, चिंचवड ४२.५, बारामती ४०.०, डुडूळगाव ४२.४, हवेली ३९.९, हडपसर ४२, नारायणगाव ३९.५, मलिन ३९, बालेवाडी ४१.८, लवळे ४१.७, निमगिरी ३९.२, लोणावळा ३८.८, मगरपट्टा ४१.७, तळेगाव ४१.६, भोर ३७.८, दौंड ४१.५ आणि लवासामध्ये ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.