पुणे : अजित पवार समर्थकांकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसत असून पुण्यात गुरुवारी अजितदादा पवार समर्थकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Fri, 7 Jul 2023
  • 02:17 pm
अजित पवार समर्थकांकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती

अजित पवार समर्थकांकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसत असून पुण्यात गुरुवारी अजितदादा पवार समर्थकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली. यावेळी महाराष्ट्राच्या राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांना बळ भेटू अशी प्रार्थना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झालेले आहेत .कालच अजित पवार गटांकडून प्रवक्त्या म्हणून रूपाली पाटील ठोंबरे यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यासह अजित पवार समर्थक प्रदीप देशमुख यांचासह अनेक कार्यकर्त्याने गुरुवारी चतुर्थी निमित्त महाआरती केली आहे.

अजितदादा पवार यांच्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यासाठी गणपतीचा त्यांना आशीर्वाद भेटावा. त्यांच्या मनातल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. अशी प्रार्थना सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे असे प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे. संकष्टी चतुर्थी असल्याने दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असल्याने कार्यकर्त्यांना मंदिराच्या बाहेरूनच आरती करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest