पुणे लोहमार्ग पोलीसांनी तब्बल ६ कोटींचा गांजा केला नष्ट

पुणे लोहमार्ग पोलीसांनी कारवाईमध्ये जप्त केलेला ०६ कोटी रुपयांचा तब्बल १ हजार किलो गांजा व २५ लाख रुपयांचा ०७ किलो ८९६ ग्रॅम चरस असा एकुण ०६ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 15 Jun 2023
  • 10:19 am
पुणे लोहमार्ग पोलीसांनी तब्बल ६ कोटींचा गांजा केला नष्ट

पुणे लोहमार्ग पोलीसांनी तब्बल ६ कोटींचा गांजा केला नष्ट

सन १९९२ पासून कारवाईमध्ये करण्यात आला होता जप्त

पुणे लोहमार्ग पोलीसांनी कारवाईमध्ये जप्त केलेला ०६ कोटी रुपयांचा तब्बल १ हजार किलो गांजा व २५ लाख रुपयांचा ०७ किलो ८९६ ग्रॅम चरस असा एकुण ०६ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. हे अमली पदार्थ सन १९९२ पासून ते आतापर्यंत केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले होते. या अंमली पदार्थांना जाळून नष्ट करताना सुमारे १६ तासांचा अवधी लागला आहे.

लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे लोहमार्ग जिल्हयातील पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे, दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे आणि सोलापुर लोहमार्ग पोलीस ठाणे अशा ०४ पोलीस ठाणे अंतर्गत सन १९९२ ते आदयाप पर्यंत अंमली पदार्थ कारवाईमध्ये कारवाई करण्यात आली होती. यात एकुण ४७ केसेसमधील १ हजार ५०० किलो वजनाचे अंमली पदार्थ (गांजा, चरस ) असे जप्त करण्यात आले होते. त्यापैकी २९ गुन्हयातील गांजा व चरस असा जप्त मुदेदमाल नष्ट करण्यात आला आहे.

गांजा आणि चरस नष्ट करण्याअगोदर पोलीसांनी त्यांची पुर्णपणे रासायनिक प्रक्रिया केली होती.  त्यानंतर अंमली पदार्थ मुद्देमाल महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीमध्ये छोटया ५० बॅग करून भट्टीमध्ये कोळसा व विजेरी किरणांच्या सहाय्याने जाळुन नष्ट करण्यात आला. हे नष्ट करण्यासाठी साधारण १६ तासांचा अवधी लागल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest