पुणे : ऐन दिवाळीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
मुंबईपाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जात आहे. पुण्यात झपाट्याने विकसित होत असलेली मेट्रो, पुण्यात येत असलेले नवनवीन उद्योगधंदे, आयटी कंपन्या यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरात वाहनांचीदेखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. एरवी वाहनांनी आणि माणसांनी गजबजलेले पुणे शहरातील रस्ते यंदाच्या दिवाळीत मात्र सामसूम झाल्याचे पाहायला मिळते आहे.
हे फोटो कोविडकाळातील नसून दिवाळीतीलच आहेत. दिवाळीनिमित्त आपापल्या गावी बहुतांश लोक गेलेले आहेत. शुक्रवारी (दि. १) लक्ष्मीपूजन असल्याने रस्त्यावर अशा प्रकारचा शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रख्यात दंत चिकित्सक डॉ. गौतम गोवित्रीकर आणि ओंकार कुदळे यांनी ‘सीविक मिरर’ला ही छायाचित्रे पाठवली.