केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक गिरीश सोनावणे, हेमंत पाटील, अंकुश चिंतामण यांना जाहीर

कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बिटकॉइन घोटाळा प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करणारे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण या दोन्ही अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

छायाचित्रे : अनुक्रमे हेमंत पाटील, गिरीश सोनावणे, अंकुश चिंतामण

पुणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासात सर्वात मोठ्या ५०० कोटी रुपयांच्या अपसंपदा बाळगल्याबाबतच्या खटल्याचा सर्वात जलद व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे, पुण्यामधून ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बिटकॉइन घोटाळा प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करणारे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. सोनवणे यांना सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या ५०० कोटी रुपयांच्या खटल्यात ८ महिन्यात पहिले दोषारोपपत्र निरीक्षक सोनावणे यांनी दाखल केले होते. नाझीरकर याची उत्पन्नापेक्षा ११६२ टक्के अधिक मालमत्ता आढळली आहे. त्याच्या २० बेनामी मालमत्ता सुरुवातीला उघड झाल्या असून त्यात नंतर अधिक भर पडली होती. नाझीरकर याच्या ३८ बेनामी कंपन्या आणि त्यात गुंतविलेला पैसा याचा अतिशय गुंतागुंतीचा हा तपास होता. सोनावणे यांनी पुणे शहर पोलीस दलात २०१२ ते २०१९ या काळात फरासखाना पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा येथे काम पाहिले आहे. त्यानंतर २०१९ ते २०२३ दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागात ते कार्यरत होते. 

१८ जुलै २०२४ रोजी गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल दहा लाखांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला होता. पोलीस शिपाई अमोल नजन, प्रदीप चव्हाण, पोलीस हवालदार बालारफी शेख, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कामगिरी केली होती. 'पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे 'इसिस मॉड्युल' उघडकीस आले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली. पुढे हा तपास एटीएस आणि नंतर एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला. एनआयएनकडून याचा सखोल तपास करीत एक एक कडी उलगडत नेली. या तपासात आयसीसचे महाराष्ट्र मोड्यूल उघडकीस आले. या कारवाईमुळे देशावरचे मोठे संकट टळले.

दिल्ली येथे राहणाऱ्या भारद्वाज बंधूंनी २०१६-१७ मध्ये केलेल्या बिटकॉइन घोटाळ्याचा चिंतामण यांनी तपास केला होता. आरोपींनी बीटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. अनेक गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी एजंटांचे जाळे तयार करीत देशभरातून लाखो बिटकॉइन गुंतवणूक स्वरूपात उकळले. कोणताही परतावाही न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. पुणे शहरात २०१८ मध्ये निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास निरीक्षक चिंतामण यांनी केला होता.

केंद्रीय पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. आपल्या कामाची केंद्रीय पातळीवरुन दखल घेतल्याचा खूप आनंद आहे. अधिक जिद्दीने आणि कठोर मेहनत घेऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. 
- गिरीश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest