Pune News : महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, तर महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश

पुणे : विधानसभा निवडणूकीचा आखाडा रंगला असून आता उमेदवार देखिल ठरले आहे. निवडणूकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि. ४) होती. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करुन बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कसबा, पर्वती मतदारसंघातील उमेदवारांची डोकेदुखी वाढणार

पुणे : विधानसभा निवडणूकीचा आखाडा रंगला असून आता उमेदवार देखिल ठरले आहे. निवडणूकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि. ४) होती. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करुन बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले आहे. तर महाविकास आघाडीतील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याने आघीडीच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बंडखोरांचा नेमका फायदा कोणाला अन् तोटा कोणाला हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

पुण्यातील कसबा विधानमतदार संघातून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार रवींग्र धंगेकर यांना महाविकास आघाडीकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा थेट सामना भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या सोबत होणार आहे. पोटनिवडणूकीत भाजपचा बालेकिल्ले धंगेकरांनी खेचून आणला होता. त्यामुळे आताच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने संपूर्ण तयारी केली असून काहीकरुन भाजपचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी ताकद लावली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पूर्ण ताकदीनिशी लढावे लागणार आहे. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने धंगेकरांची डोकेदुखी वाढली होती. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांची समजूत काढण्यात कॉंग्रेसला यश आल्याने त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून मुख्तार शेख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. धंगेकरांची डोकेदुखी कमी करण्यासाठी बंडखोरी केलेल्या व्यवहारे यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अंकुश काकडे यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मात्र आपल्यावर वरिष्ठ मंडळी आणि उमेदवार विविध पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणू शकतात, म्हणून व्यवहारे यांनी बंडखोरी करत आपला फोन बंद करून नॉटरिचेबल झाल्या. अर्ज माघारी घेण्याची वेळ संपल्यानंतर ते आता अपक्ष उमेदवार म्हणून कसब्यातून निवडणूकीच्या रिंगणात दिसणार आहे. त्यांच्यामुळे धंगेकर यांना फटका बसेल असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता कसब्याची निवडणूकीत नेमके कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

दरम्यान, पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पर्वती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अश्विनी कदम निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची थेट लढत भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी होणार आहे. कदम यांच्या विरोधात त्यांच्या नावाचे दोन डमी उमेदवार उभे आहेत. त्याचा त्यांना फटका बसू शकतो. असे असताना आघाडी धर्म न पाळता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी फोनद्वारे त्यांचे बोलणेही करून दिले असल्याचे सांगण्यात आले होते. तरी देखील आबा बागुल हे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बागुल यांच्यामुळे कदम यांच्या मतांवर परिणाम होऊन याचा फायदा मिसाळ यांना होईल, असा दावा केला जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन तीन पक्ष एकत्रित आल्याने नाराजांची संख्या वाढली आहे. इच्छुक असताना उमेदवारी न मिळाल्याने तसेच मतदार संघ मित्र पक्षाला सुटल्याने नाराज असलेले नेत्यांनी पक्षाची बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या बंडोखोरांना थंड करण्यासाठी पक्षाकडून विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. परंतु  काही बंडखोरांना थंड करण्यात काही पक्षांना अयश आले. कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest