पुणे : आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

लाच प्रकरणी अटकेत असेलेल्या महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 17 Jun 2023
  • 11:44 am
आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

८ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ९ जूनला रामोड यांना झाली होती अटक

लाच प्रकरणी अटकेत असेलेल्या महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

पुणे-सोलापूर महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी रामोड यांनी शेतकऱ्याकडे ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. ८ लाखाची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय-एसीबी) पथकाने ९ जूनला राठोड यांना पकडले होते. त्यानंतर २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठोठावण्यात आली आहे. सध्या त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

रामोड यांनी १४ जून रोजी त्यांचे वकील सुधीर शाह यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश ए एस वाघमारे यांच्याकडे जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जास सीबीआयचे वकील अभयराज अरीकर यांनी विरोध केला. डॉ. रामोड यांनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. ते उच्चपदस्थ अधिकारी असून, त्यांना जामीन मंजूर झाल्यास पुरावे गोळा करण्यात अडचणी येऊन पुरावे नष्ट करण्यासह साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. रामोड याच्या घरझडती दरम्यान सहा कोटी ६४ लाख रुपये जप्त करण्यात आले असून कार्यालयातून एक कोटी २८ लाख हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांच्या नावे विविध स्थावर मालमत्ता असून, त्याची किंमत ५ कोटी ३० लाख रुपये आहे. त्याच्या कार्यालयातील कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. त्यास जामीन दिला, तर तो ती कागदपत्रे नष्ट करण्यासह त्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यात असून, जामीन दिल्यास तो तपासास सहकार्य करेल अशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी विनंती ॲड. अरीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest