पुणे: विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त

दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पुण्याच्या सीमा शुल्क विभागाने (कस्टम) केली आहे. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 11:29 am
Pune: विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त

विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त

४१ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पुण्याच्या सीमा शुल्क विभागाने (कस्टम) केली आहे. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले.

या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-५२ या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

संबंधित महिलेने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला. त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कस्टम विभागाचे पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest