संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरात पुढील २ ते ३ दिवस तपमानात घट दिसून येईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे मध्य महाराष्ट्रात धडकणार असल्या कारणाने तपमानातील ही घट दिसून येणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे आणि निरभ्र आकाशामुळे शहराच्या आणि राज्याच्या इतर भागाच्या तपमानात २-३ अंश सेल्सियस घट होणार असल्याचा अंदाज आहे. (Pune Weather News)
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ७२ तास पुण्यात आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहील.
रविवारी सकाळी शहराच्या काही भागात धुके होते. तर १६ जानेवारी रोजी शिवाजीनगर येथे १०.८ अंश सेल्सियस इतक्या किमान तपमानाची नोंद झाली आहे. २३ जानेवारीच्या सकाळपर्यंत शहरात धुके असेल. तर २७ जानेवारी पर्यंत तपमान १२ ते १३ अंश सेल्सियस इतके असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.