साधू वासवानी चौकात ऑटो रिक्षाचा अपघात
पुण्यातील साधू वासवानी चौकातील पेट्रोल पंपाजवळ एका ऑटो रिक्षाचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही रिक्षा रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगवर धडकली. हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
या रस्त्यावर पीएमपी बस थांबा आहे. या थांब्यावर एकामागे एक अशा तीन बस उभ्या होत्या. त्यांच्यामागून आलेल्या रिक्षाला वाट नसल्याने चालकाने उजव्या बाजूला रिक्षा घेतली. काही कळायच्या आतच ही रिक्षा दुभाजकाला धडकली.
या अपघातात रिक्षाचालकाच्या पायाला आणि हाताला जबर दुखापत झाली आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचे नाव समजू शकले नाही. याठिकाणी दररोज अपघात घडत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.