वाहतूक पोलीस कर्मचारी
पुण्यातील स्वारगेट वाहतूक विभागातील २ पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायर झाला होता. हा प्रकार गंगाधाम–आई माता मंदिर रस्त्यावर घडला होता. आता या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पोलीस हवालदार बाळू दादा येडे आणि पोलीस अंमलदार गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बाळू येडे आणि गौरव उभे बुधवारी (दि. १७) गंगाधाम-आई माता मंदिर रस्त्यावर कर्तव्यावर होते. यावेळी वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता वाहनचालकांकडून पैसे घेत असल्याचे समोर आले होते. तसेच वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नव्हता.
हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. एका युजर्सने कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना पुणे वाहतूक पोलीसांना टॅग केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता. हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.