पुणे : कल्याणीनगरमधील सलूनला भीषण आग

पुण्यातील कल्याणीनगर भागातील सलूनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Fri, 7 Jul 2023
  • 10:28 am
Pune fire : कल्याणीनगरमधील सलूनला भीषण आग

कल्याणीनगरमधील सलूनला भीषण आग

अग्निशमक दलाच्या जवानांनी अवघ्या १० मिनिटात आग आणली आटोक्यात

पुण्यातील कल्याणीनगर भागातील सलूनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास  ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीगर भागातील लॅक्मे सलूनमधून सकाळी सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. धुर दिसताच नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या १० मिनिटांत सलूनमधील आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत सलूनमधील साहित्य जळून खाक झाले आहे. परंतू, आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest