पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला पाच हजार जणांची ‘दांडी’; सर्वांवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

लोकसभा निवडणुकांच्या तयारीकरिता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक कामकाजाचे नियोजन देखील सुरू करण्यात आले

loksabha Election 2024

पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला पाच हजार जणांची ‘दांडी’; सर्वांवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

पुणे : (loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकांच्या तयारीकरिता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक कामकाजाचे नियोजन देखील सुरू करण्यात आले असून या कामासाठी एकूण ७१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. या प्रशिक्षणाला तब्बल ५ हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. 

 डॉ. दिवसे यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने कामकाज आणि नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्याचा भौगोलिक आकार राज्याच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मोठा आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदार संघ पुणे जिल्ह्यात आहेत. या चारही मतदार संघांमध्ये एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्र असणार आहेत. या चारही मतदार संघातील मतदानाच्या आणि निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीसाठी तब्बल ७१ हजार अधिकारी  व कर्मचारी लागणार आहेत. त्यांना ही यंत्रणा कशी राबविली जाणार आहे याचे प्रशिक्षण या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. या प्रशिक्षणाला अपेक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के कर्मचारी अनुपस्थित होते. यातील काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दोन आदेश मिळाले असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्याची शहानिशा करून उर्वरित गैरहजार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. 

शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना काम करताना दिलासा मिळेल असे नियोजन केले जाणार आहे. काही शासकीय विभागांमध्ये महिलांची संख्या ४० टक्क्यांच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना लांबच्या ठिकाणी पाठवणे सोईचे होणार नाही. त्यामुळे या महिलांना त्यांच्या जवळच्या मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना प्रवास व अन्य कामाचा ताण जाणवणार नाही. यासोबतच महिलांच्या सोईच्यादृष्टीने एका महिलेसोबत दुसरी महिला कर्मचारी जोडीदार म्हणून दिली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest