नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावर असलेल्या PSI चा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकीकडे नवर्षाचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील पोलिस उपनिरीक्षकाचा कर्तव्य बजावून घरी परताना अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं पिंपरी चिंचवड भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या PSIयांचे नाव जितेंद्र गिरनार असं आहे. कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
अपघात नेमका कसा घडला?
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली.
या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गिरनार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे