संग्रहित छायाचित्र
पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. या अपघातामध्ये अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शोरुम मालकांना ग्राहकांना दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याची सक्ती केली आहे. यासंबंधित पत्रकदेखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
आता दुचाकीस्वारांचे वाढत्या अपघातांमुळे पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत आहे. परंतु आता रस्त्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात (2024) मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत.