संग्रहित छायाचित्र
दोन्ही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना तातडीने कडक शासन झाले पाहिजे. संतोष देशमुख यांच्या खुनाचे मास्टर माईंड शोधले पाहिजेत. खटल्याचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंढे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये. त्वरित त्यांचा पाय उतार व्हावा.
या मागणीसाठी समाजवादी पक्ष, पुणे शहर च्या वतीने २४ तासांचे लाक्षणिक उपोषण दिनांक ०२/०१/२५ रोजी पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर संपन्न झाले. जांबुवंत सागरबाई मनोहर यांच्या पुढाकाराने उपोषण पार पडले.