पीएमआरडीए होत आहे पेपरलेस

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणात नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी पेपरलेस कारभार सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोन विभागात सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर ती इतर विभागातदेखील राबवण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 04:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नागरिकांचे हेलपाटे वाचणार, अतिक्रमण बांधकाम निर्मूलन, विकास परवानगी विभागातील कामकाजात बदल

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणात नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी पेपरलेस कारभार सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोन विभागात सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर ती इतर विभागातदेखील राबवण्यात येणार आहे. यामुळे अर्जदारांना, नागरिकांना प्राधिकरणातील कार्यालयात न येता त्यांना आपल्या फाईलचे स्टेटस ऑनलाइन माध्यमातून पाहता येणार आहे. सध्या विकास परवानगी विभागातील चलन भरणे, गृह प्रकल्प योजना हा कारभार ऑनलाईन सुरू आहे. त्यानंतर आता पुढील योजनेत ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

राज्यामध्ये विविध शासकीय कार्यालयात यापूर्वीच ई. ऑफिसप्रणाली सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सूचना केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व कार्यामध्ये त्याचे पालन करण्यात आले होते. 

पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे कार्यालय समाविष्ट करण्यात आले. दरम्यान, यानंतर एकूणच पीएमआरडीएची सीमा वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये ९ तालुक्यांमधील जवळपास ८०० गावांचा समावेश आहे. वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या नागरिकांना प्राधिकरणामध्ये वेगवेगळी परवानगी, दाखले आणि बिल्डिंग परमिशन साठी हेलपाटे मारावे लागतात.

त्यामुळे संपूर्ण दिवस खर्ची होऊनदेखील कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. यापैकी बहुतांश प्रकरणेही विकास परवानगी विभाग अर्थात बांधकाम प्रकरणासंबंधित आहेत. त्यानंतर अभियांत्रिकी, प्रशासन आणि अधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामध्ये नागरिक येत असतात. मात्र, अधिकारी उपलब्ध नसल्यास कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते. 

दरम्यान, नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत, त्याचप्रमाणे संबंधित अर्जदारांना त्याची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आता पेपरलेस म्हणजेच ऑनलाइनच्या माध्यमातून कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे बिल्डिंग परमिशन पासून ते प्रशासकीय माहिती उपलब्ध देणेपर्यंत बहुतांश कामेही ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना आता करता येणार आहेत. सद्यस्थितीमध्ये वेगवेगळी कागदपत्रे, परवानगी यांची प्रत जोडून कार्यालयामध्ये द्यावी लागते. ती फाईल वेगवेगळ्या विभागात गेल्यानंतर ती विकास परवानगी विभागामध्ये दाखल होते. मात्र, या दरम्यान अर्जदार फाईलसाठी हेलपाटे मारतो. त्याची फाईल नेमकी कोणते विभागात आहे त्याची माहिती लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कारभारावरती नाराजी व्यक्त केली जात होती.

दिवसाला दहा ते पंधरा फाईल

विकास परवानगी विभागामध्ये पीएमआरडीएमधील वेगवेगळ्या गावातून बांधकाम परवानगीसाठी फाईलची नोंद केली जाते. त्यात दिवसाला जवळपास दहा ते पंधरा फाईली या इनवर्ल्ड होत असतात. दरम्यान, नवीन कामकाजात बदल केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून दीपक सिंगला यांच्याकडे या विभागाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या कामाला गती मिळाली असून, कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तातडीने त्या फाईलवर स्वाक्षरी करण्यात येत आहे.

नागरिकांना कार्यालयात येणारे हेलपाटे वाचावे यासाठी पेपरलेस कारभारावरती भविष्यामध्ये भर देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्राधिकरणातील वेगवेगळ्या विभागामध्ये पेपरलेस कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या अर्जाची माहिती मिळेल.  - दीपक सिंगला, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण

Share this story

Latest