पीएमपीएमएलच्या दोन बस मार्गांचा आजपासून श्रीगणेशा
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आजपासून (शुक्रवार) शहरातील दोन मार्गांचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवरून शहरात येणाऱ्या व शहरातून हडपसर रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन (मार्गे - मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी) पर्यंत काही खेपा देण्यात येणार आहेत.
तसेच मुंढवागांव व वाघोली परिसरातील प्रवाशांच्या सोईसाठी मार्ग क्र. १९८ मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली) असा मार्ग सुरु करण्यात आला आहे. या मार्गावरील बस प्रत्येकी एक तासानंतर धावणार आहे.
असे आहेत बस मार्ग :
बस क्रमांक १५६
>>हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन
मार्ग : मगरपट्टा, मुंढवागाव, मुंढवा चौक, लोणकर कॉलनी.
बस क्रमांक १९८
>>मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली)
मार्ग : माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातवपार्क, वाघोली बाजार.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.