पीएमपीएमएलचे स्टिअरिंग मद्यधुंद चालकाच्या हातात, तरुणांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

पीएमपीएमएलची बस दारूच्या नशेत असताना चालकाने पुणे स्टेशनवरून हडपसर परिसरातील काळेपडळ येथे आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सुमारे १० ते १२ प्रवाशी होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 01:28 pm
PMPML : पीएमपीएमएलचे स्टिअरिंग मद्यधुंद चालकाच्या हातात, तरुणांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

पीएमपीएमएलचे स्टिअरिंग मद्यधुंद चालकाच्या हातात

तरुणांनी बस थांबवताच चालक गेला पळून

पीएमपीएमएलची बस दारूच्या नशेत असताना चालकाने पुणे स्टेशनवरून हडपसर परिसरातील काळेपडळ येथे आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सुमारे १० ते १२ प्रवाशी होते. मात्र, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच बसमधील दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरूवारी (दि. १५) घडली आहे.

गुरुवारी बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तर बस क्रमांक एमएच १४ सीडब्लू १९८१ ही पुणे स्टेशन येथील डेपोमध्ये उभी होती. मध्यधुंद चालकाने बस डेपोमधून काढली. नंतर थेट हडपसर येथील काळेपडळ येथे आणली. काळेपडळमधील फराटे चौकातील रेल्वे क्रॉसिंगजवळ येताच त्याने गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेतली.

मात्र, यावेळी चालक मद्यधुंद आहे, हे गाडीत असलेल्या गणेश काळसाईत आणि मयूर बोराडे या दोन तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीचे स्टेअरिंग ताब्यात घेतले आणि गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, तरुणांनी बस थांबवताच चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. बेजबाबदारपणाने बस चालवणाऱ्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest