पीएमपीएमएल बसची पादचाऱ्याला धडक, जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पीएमपीएमएल बसने मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचारी जेष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७६ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील कोंढवा परिसरातील साळुंखे विहार रस्त्यावरील रिलायन्स फ्रेश समोर २९ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 30 Jun 2023
  • 04:19 pm
Accident : पीएमपीएमएल बसची पादचाऱ्याला धडक, जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

अपघातानंतर बस चालकाचा घटनास्थळावरून पोबारा

पीएमपीएमएल बसने मॉर्निंग वॉकला गेलेल्या पादचारी जेष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७६ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील कोंढवा परिसरातील साळुंखे विहार रस्त्यावरील रिलायन्स फ्रेश समोर २९ जून रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडला.

बिपीन जसवंतराय दवे (वय ७६, रा. प्रसुन सेनेट, साळुंखे विहार रोड, वानवडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी बिपीन यांचा मुलगा हेतव दवे (वय ४४, रा. कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएमपीएमएल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन दवे गुरूवारी सकाळी ७ च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीएमएल बसने त्यांना धडक दिली. यामध्ये बिपीन दवे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी दवे यांना मृत घोषीत केले.

दरम्यान, दवे यांना धडक दिल्यानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी बिपीन दवे यांच्या मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, बस चालकाविरोधात कलम २७९, ३०४ (अ), मो. व्हे. अॅक्ट कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चालकाना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest