water supply : पुणेकरांनो, उद्या संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

संपुर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या (गुरूवारी) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 17 May 2023
  • 12:05 pm
पुणेकरांनो, उद्या संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

पाणीपुरवठा बंद

पुणे शहराचा दर गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद

संपुर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या (गुरूवारी) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

यंदा पावसाळा उशिरा सुरु होण्याची तथा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच सध्या धरणातील पाण्याचा साठ्याचा विचार करत पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यानुसार १८ मे २०२३ रोजी पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात झालेल्या निर्णयानुसार गुरुवारी संपुर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी याबाबत नोंद घ्यावी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest