पुणे रेल्वे स्थानकातील जुना पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला

पुणे रेल्वे विभाग प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकातील पादचारी उड्डाणपूल क्रमांक ३ चा पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 15 Jun 2023
  • 04:27 pm
पुणे रेल्वे स्थानकातील जुना पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला

संग्रहित छायाचित्र

सर्व प्रवाशांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे रेल्वे विभाग प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकातील पादचारी उड्डाणपूल क्रमांक ३ चा पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातील जुना पादचारी उड्डाणपूल क्रमांक ३ हा केवळ दिव्यांग व्यक्तींना ये-जा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. या पुलाची रुंदी ४.६ मीटर एवढी होती. आता या पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर या पुलाची रुंदी आता ३ मीटर एवढी करण्यात आली असून सर्वांसाठी हा पुल खुला करण्यात आला आहे.

या पुलावर जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या आणि साध्या पायऱ्या आहेत. यामुळे आवश्यकतेनुसार प्रवाशांना हव्या त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास अधिक मदत होणार आहे. या उड्डाणपूलाचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा, अशी विनंती पुणे रेल्वे विभाग प्रशासनाने केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest