पदपथावर अडथळ्यांची शर्यत...
नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, हा पदपथ बांधण्याचा मूळ उद्देश असतो. मात्र, शहरातील पदपथांची स्थिती पाहिल्यावर हा उद्देश सफल होताना दिसतच नाही. पेव्हर ब्लॉकची दुरवस्था, वीजवाहिन्यांचे जाळे, वाहनांचे बेकायदा पार्किंग, पथारीवाल्यांची दुकाने यासह अनेक कारणांमुळे पदपथावरून चालणे जीकिरीचे ठरत असून, याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.